
आपण घरात नकारात्मक वाटू नये, घरातील वाईट उर्जा निघून जावी यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक लोक वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घेतात. वास्तूतील दोष दूर व्हावे म्हणून उपाय केले जातात. पण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणचे वास्तू दोष नाहीसे करणेही गरजेचे आहे.
आजकाल प्रत्येकाच्या कामाचा प्रकार हा ८ तासाचा जॉब फिक्स असतो. म्हणजे दिवसाचे ८ तासांचे विभाजन केले. तर ८ तासांचे काम, ८ तासांची झोप आणि बाकीचे ८ तास इतर कामांसाठी आपण गृहित धरतो. जे महत्त्वाचे ८ तास असतात ते आपले ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे तिथली नकारात्मकता आपल्या शरीरावर,मनावर परिणाम करणारी ठरू शकते.