
पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त सायंकाळी ७.२९, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५४, महाराष्ट्र दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2022
पंचांग -
रविवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त सायंकाळी ७.२९, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ६.५४, महाराष्ट्र दिन, भारतीय सौर वैशाख ११ शके १९४४.
दिनविशेष -
१९९८ - ‘कोकण रेल्वे’चा प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
२००५ - पुणे विद्यापीठाचे ‘विद्यावाणी’ हे रेडिओ केंद्र कार्यान्वित.
२००५ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान.
२००७ - पुण्याची बुद्धिबळपटू ईशा करवडेने इंटरनॅशनल मास्टर या किताबाचे तिन्हीही नॉर्म पूर्ण केले. दुबई खुल्या स्पर्धेत तिने तिसरा व शेवटचा नॉर्म निश्चित केला. अशी कामगिरी करणारी ती भारताची केवळ चौथी, तर महाराष्ट्राची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली.