आजचे पंचांग आणि दिनविशेष - 09 जानेवारी 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 09 जानेवारी 2022

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 09 जानेवारी 2022

पंचांग -

रविवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी १२.१२, चंद्रास्त रात्री १२.४२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१३, भानुसप्तमी, भारतीय सौर पौष १९ शके १९४३.

दिनविशेष -

१९९७ - दिवंगत उद्योगपती आदित्य बिर्ला यांना ‘केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड’ (सीईडब्ल्यू)तर्फे मरणोत्तर ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार जाहीर.

२००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या ‘अग्नी-१’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी.

२०११ - नऊ वर्षांनी एकत्र आलेल्या भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीने चेन्नई टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले.

२०१५ - श्रीलंकेच्या अध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणत विरोधी उमेदवार मैत्रीपाल सिरीसेना यांनी विजय मिळविला.

२०१८ - तुर्कस्तान येथे झालेल्या स्किइंगच्या ‘अल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात आंचल ठाकूर हिने ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
loading image
go to top