आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ८.३९, चंद्रास्त सकाळी ९.३२, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ५.५७, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष २० शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 डिसेंबर 2022

पंचांग -

रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ८.३९, चंद्रास्त सकाळी ९.३२, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ५.५७, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष २० शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१४ - संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येईल, असे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांतील आपल्या पहिल्या भाषणात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा, असा प्रस्ताव ठेवला होता. मोदींच्या या प्रस्तावाचे १७० देशांनी समर्थन केले.

  • २०१५ - भारताने जी-सॅट १५ या आपत्कालीन सेवांसाठी उपयुक्त असलेल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रेंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानकावरून हे प्रक्षेपण केले. या उपग्रहासोबत सौदी अरेबियाच्या ‘अरबसॅट-६ बी’ चेही प्रक्षेपण झाले.

  • २०१६ - इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीने द्विशतक झळकाविले.