Thur, March 23, 2023

Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 फेब्रुवारी 2023
Published on : 12 February 2023, 1:22 am
पंचांग
रविवार : माघ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रा. १२.०७, चंद्रास्त स. ११.०२, पारशी मेहेर मासारंभ, भारतीय सौर माघ २३ शके १९४४.
दिनविशेष
१९९९ : संगीत क्षेत्रात केलेल्या असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरांटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे ‘डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ॲवॉर्ड’ जाहीर.
२००३ : आवाजापेक्षा दुप्पट वेगाने (स्वनातीत) जाणाऱ्या जहाजविरोधी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्यापासून दूरवर बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी.
२००५ : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने हैदराबाद डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.