आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 डिसेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 डिसेंबर 2022

पंचांग

रविवार : पौष शुद्ध २/३, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ८.५९, चंद्रास्त रात्री ८.१७, ख्रिसमस, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष ४ शके १९४४.

दिनविशेष

१९९८ : संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. कलानाथ शास्त्री व प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. कल्याणदत्त शर्मा यांना ‘राष्ट्रपती पुरस्कार’ जाहीर.

२०११ : पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने घेतलेल्या बेमुदत निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या समाधान घोडकेने चंद्रहार पाटीलला एक तास ५० मिनिटांच्या लढतीनंतर कलागंज डावावर चितपट केले.

२०१४ : गुजरातमधील सबरकांथा जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार ४७ लोकांनी जिल्ह्यातील १८९० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत विश्‍वविक्रम केला.

२०१४ : भारताचा तरुण प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू के. श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत ‘टॉप फाइव्ह’मध्ये स्थान मिळविले. पहिले ऑल इंग्लंड विजेते प्रकाश पदुकोण आणि राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसराच भारतीय ठरला.

२०१४ : राजस्थानची प्रतिभाशाली नेमबाज अपूर्वी चंडेलाने राष्ट्रीय स्पर्धेत वरिष्ठ गटात यश मिळविले.