
Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 फेब्रुवारी 2023
पंचांग
रविवार : फाल्गुन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.१०, चंद्रास्त रात्री १२.३७, भानुसप्तमी, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४४.
दिनविशेष
२००३ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशातील अग्रगण्य उद्योगपती दिवंगत शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशित.
२००३ : राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये अनावरण झाले.
२००३ : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने २३ धावांत सहा बळी घेण्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताने ८२ धावांनी विजय नोंदविला.
२०१४ : कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची आशिया करंडक सामन्यात बांगलादेशविरुद्ध २१३ धावांची भागीदारी. भारताकडून चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी म्हणून नोंद.पंचांग