आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 नोव्हेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शनिवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.३१, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, शनिप्रदोष, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाहारंभ, भारतीय सौर कार्तिक १४ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 नोव्हेंबर 2022

पंचांग -

शनिवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.३१, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, शनिप्रदोष, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाहारंभ, भारतीय सौर कार्तिक १४ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९५ - ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांना आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान.

  • २००० - राजुरी (ता.जुन्नर) येथील पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे संघटक बाळासाहेब औटी यांना ‘मॅग्नम पुरस्कार’ जाहीर.

  • २००८ - वर्णद्वेषाचे वर्षानुवर्षांचे जोखड झुगारून बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ऐतिहासिक निवडणूक जिंकली. ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.

  • २००९ - सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सतरा हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा धडाकेबाज शतकी खेळीने गाठला.

  • २०१४ - ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना रंगभूमीदिनी सांगली येथे विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान.