Wed, March 29, 2023

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 मार्च 2023
Published on : 6 March 2023, 1:21 am
पंचांग
सोमवार : फाल्गुन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त सकाळी ६.४७, होळी, हुताशनी पौर्णिमा, होलिका प्रदीपन, कुलधर्म, पौर्णिमा प्रारंभ दुपारी ४.१८, भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४४.
दिनविशेष
१९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक व ज्येष्ठ तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांची धर्मविषयक विकासकार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘टेंपल्टन पुरस्कारा’साठी निवड.
२००५ : संपूर्ण स्वदेशी बनावटीची देशातील सर्वांत मोठी व पहिली ठरलेली ५४० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी तारापूरमध्ये कार्यान्वित.