आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - रविवार : आश्‍विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त सकाळी ६.४०, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, कोजागरी पौर्णिमा, आकाश दीपदान, शरद पौर्णिमा, ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे, कुलधर्म, कार्तिक स्नानारंभ, नवान्न पौर्णिमा, रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन, अग्रायण, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री २.२५, ईद-ए-मिलाद, जैन आयंबील ओळी समाप्ती, भारतीय सौर आश्‍विन १७ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2022

पंचांग -

रविवार : आश्‍विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त सकाळी ६.४०, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, कोजागरी पौर्णिमा, आकाश दीपदान, शरद पौर्णिमा, ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे, कुलधर्म, कार्तिक स्नानारंभ, नवान्न पौर्णिमा, रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन, अग्रायण, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री २.२५, ईद-ए-मिलाद, जैन आयंबील ओळी समाप्ती, भारतीय सौर आश्‍विन १७ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - आपल्या आकाशगंगेबाहेरील आकाशगंगेचे सर्वांत मोठे किरणोत्सर्गी केंद्र (क्वास्सार) शोधण्यात नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍सच्या (एन.सी.आर.ए.) शास्त्रज्ञांना यश.

  • २००० - महाराष्ट्राचा धावपटू सचिन नवले याने कलकत्ता येथे झालेल्या ४० व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत प्रतिष्ठेची १०० मीटर शर्यत फोटोफिनिशमध्ये जिंकून सर्वाधिक वेगवान धावपटूचा किताब मिळविला.

  • २००६ - अमेरिकेसह जगाचा दबाव धुडकावून लावून उत्तर कोरियाने पहिल्या अणुबाँबची यशस्वी भूमिगत चाचणी घेतली.

  • २००९ - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर.