आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2021

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2021

पंचांग -

गुरुवार : कार्तिक कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय रात्री १०.५१, चंद्रास्त सकाळी ११.३३, सूर्योदय ६.४८, सूर्यास्त ५.५४, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून सायं. ६.४९ प., भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४३.

दिनविशेष -

१९९४ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ‘राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर.

१९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

२००२ - सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या अतिरिक्त महासंचालकपदी एअर व्हाइस मार्शल श्रीमती पी. बंदोपाध्याय यांची नियुक्ती. एअर व्हाइस मार्शल या पदावर त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

२००९ - ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणाऱ्या ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ठरल्या.

२००९ - राहुल द्रविडने कसोटी कारकीर्दीतील २८ वे शतक झळकविताना १४४ धावांची चमकदार खेळी करून सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत चौथे स्थान पटकावले.

loading image
go to top