आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2021

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2021

पंचांग -

शुक्रवार : कार्तिक कृष्ण ७, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय रात्री ११.४५, चंद्रास्त दुपारी १२.१६, सूर्योदय ६.४८, सूर्यास्त ५.५४, भारतीय सौर मार्गशीर्ष ६ शके १९४३.

दिनविशेष

२००४ - ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना तानसेन पुरस्कार जाहीर.

२००८ - मुंबई शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांसह एकूण १७३ ठार, तर २५० हून अधिक नागरिक जखमी.

२०१४ - ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर.

२०१५ - अण्वस्त्रधारी ‘पृथ्वी २’ या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी.

२०१७ - इराणमध्ये गॉर्गन येथे झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्ध्यांना कबड्डीचे धडेच देत एकतर्फी विजेतेपदाला गवसणी घातली.

loading image
go to top