Mahakumbh Mela 2025 : त्रिवेणी संगमावर ‘हर हर महादेव’चा गजर! पहिल्या दिवशी दीड कोटीहून अधिक भाविकांचे शाहीस्नान
Triveni Sangam : पौष पौर्णिमेनिमित्त त्रिवेणी संगमावर पहिल्या दिवशी शाही स्नानासाठी दीड कोटीहून अधिक भाविक उपस्थित झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर थंड पाण्यात स्नान करून त्यांनी 'हर हर महादेव'चा गजर केला.
महाकुंभ नगर, ता. १३ (पीटीआय) : नदीकिनाऱ्यावर पसरलेले धुके अन् कडाक्याच्या थंडीत लाखो भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर हाडे गोठवणाऱ्या थंड पाण्यात सोमवारी पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान केले.