
Panchang 7 December : आज हिरवे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक ७ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण १६ शके १९४४
आज सूर्योदय ०६:५८ वाजता होणार तर आज सूर्यास्त १७:५४ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १७:१८ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:४० ते स.०६:५८ दरम्यान होणार
आज सायं संध्या ही १७:५४ ते १९:१२ दरम्यान होणार तर आज अपराण्हकाळ हा १३:३२ ते १५:४३ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १७:५४ते २०:३१ दरम्यान होणार तर निशीथ काळ हा २४:०० ते २४:५२ दरम्यान होणार. आज राहु काळ हा १२ः२६ ते १३:४८ दरम्यान होणार तर यमघंट काळ हा ०८ : २० ते ०९ : ४२ दरम्यान होणार. आज श्राद्धतिथी ही पौर्णिमा श्राद्ध आहे.
सर्व कामांसाठी सायं.०७:४७ नं. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२१ ते दु.१२:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तीळ खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक
लाभ मुहूर्त-- १६:३२ ते १७:५४
अमृत मुहूर्त-- ०८:२० ते ०९:४२
विजय मुहूर्त— १४:१५ ते १४:५९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. चंद्र मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - हेमंत(सौर)
मास - मार्गशीर्ष
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी(०७:१६ प.नं. पौर्णिमा)
वार - बुधवार
नक्षत्र - कृत्तिका(१०:२७ प.नं. रोहिणी)
योग - सिद्ध(२७:२० प.नं.साध्य)
करण - वणिज(०७:१६ प.नं.भद्रा)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - वृश्चिक
गुरु रास - मीन
विशेष:- भद्रा ०७:१६ ते १९:४७, *श्री दत्तात्रेय जयंती, गाणगापूर क्षेत्री श्री दत्तजयंती उत्सव, कुलधर्मासाठी पौर्णिमा, चंद्रोदयी चंद्रपूजन व सुवर्णदान(चंद्रोदय-१७:१८), प.पू श्री श्रीधरस्वामी जयंती, अन्वाधान, रवियोग १०:२७ प.नं. सर्वार्थसिद्धियोग
या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे. बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. श्री दत्तगुरुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com