नांदणीमध्ये जैन मठाची स्थापना झाली त्यावेळेस नांदणीतील धर्मानुरागी राघोबा निटवे यांनी मठासाठी व महाराजांच्या कार्यालयासाठी एक खोली दिली होती, असे सांगतात.
-श्रीमती शैलजा अजित निटवे, जयसिंगपूर
Panchkalyanak Sohala Nandani : भारतात जैन धर्माची (Jainism) अनेक मठ संस्थाने आहेत. यापैकीच एक शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील प्राचीन व भव्य मठ. नंदिग्राम, नंदपूर, नंदनगर अशा विविध नावांनी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले गाव म्हणजे सध्याचे नांदणी. नांदणीच्या मध्यभागी स्वस्तिश्री जिनसेन महाराजांचा (Swastishree Jinsen Maharaj) भव्य मठ आहे. हा मठ पूर्णतः लाकडी असून, वास्तुशास्त्राची ती एक अद्भुत अनुभूती आहे. मठाच्या पूर्व बाजूस भगवान आदिनाथ तीर्थंकरांचे मंदिर आहे. बुधवारपासून येथे महामस्तकाभिषेक महोत्सव सुरू झाला असून, तो ९ जानेवारीपर्यंत चालणार आहे, त्यानिमित्त...