
Papmochani Ekadashi 2023 : आज पापमोचनी एकादशीला करा 'या' कथेचे पठन, पापांपासून व्हाल मुक्त
Papmochani Ekadashi Vrat Katha : दर महिन्याला 2 वेळा एकादशी येते. एक कृष्ण पक्षमध्ये तर एक शुक्ल पक्ष मध्ये। चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्ष मध्ये येणारी ही एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते.
धार्मिक मान्यतानुसार एकादशीच्या दिवशी कथेचं पठन केल्याने शुभ फळ मिळते आणि सर्व पापांपासून मुक्तता मिळते. आज भागवत म्हणजे वैष्णवांचे पापमोचनी एकादशीचा उपवास आहे आणि हा सर्व कार्य सिद्धीस नेणारा ‘सर्वार्थसिद्धियोग‘ आहे. जाणून घेऊया सविस्तर... (Papmochani Ekadashi 2023 read this Vrat Katha)
पापमोचनी एकादशी व्रत कथा-
शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे भगवान कृष्णने स्वंय पांडू पुत्र अर्जुनला पापमोचनी एकादशी व्रतचे महत्व सांगितले होते.असं म्हणतात की राजा मांधाताने लोमश ऋषीला जेव्हा विचारलं होतं की चुकून झालेल्या पापापासून मुक्तता कशी मिळवायची? तेव्हा लोमश ऋषीने पापमोचनी एकादशी व्रत सांगताना राजाला एक पौराणिक कथा सांगितली होती.
या कथेनुसार एक वेळा च्यवन ऋषीचे पुत्र मेधावी जंगलात तपस्या करत होते. त्यावेळी मंजुघोषा नावाची अप्सरा तेथून जात होती तेव्हा त्या अप्सराची नजर मेधावीवर पडली आणि त्या मेधावीवर मोहित झाली. यानंतर अप्सराने मेधावीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खुप प्रयत्न केले.
मंजुघोषाला असं करताना पाहून कामदेवही त्यांची मदत करण्यासाठी आले. त्यानंतर मेधावी मंजुघोषाकडे आकर्षित झाले आणि ते भगवान शिवची तपस्या करणेच विसरले. थोडा वेळ गेल्यानंतर जेव्हा मेधावीला आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी मंजुघोषाला दोषी सांगत तिला पिशाचिनी होण्याचा श्राप दिला ज्यामुळे ती अप्सरा खुप दु:खी झाली.
अप्सराने त्वरीत आपल्या चुकीसाठी क्षमा मागितली. अप्सराची क्षमा ऐकून मेधावीने मंजुघोषाला चैत्र महिन्याच्या पापमोचनी एकादशीविषयी सांगितले. मंजुघोषाने मेधावीने सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक पापमोचनी एकादशीचा व्रत केला.
पापमोचिनी एकादशी व्रतच्या पुण्य प्रभावाने तिला सर्व पापांपासून मुक्तता मिळाली. या व्रतच्या प्रभावाने मंजुघोषा पुन्हा एकदा अप्सरा बनली आणि स्वर्गात परत गेली. मंजुघोषानंतर मेधावीनेही पापमोचनी एकादशीचा व्रत केला आणि पापमुक्त झाला.