
वर्षावास हा जैन धर्मातील चार महिन्यांचा काळ आहे, ज्यामध्ये साधू-साध्वी स्थिर राहून आत्मशुद्धीवर लक्ष केंद्रित करतात.
या काळात जैन अनुयायी उपवास, ध्यान आणि तपश्चर्या करून मनाची शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नती साधतात.
वर्षावासात हिंसाचार टाळण्यासाठी साधू फिरत नाहीत, ज्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि अहिंसेचा संदेश पसरतो.
अनिल जमधडे : सकाळ वृत्तसेवा
जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान-अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते. या काळात उपोसथ विधी ‘अशुद्ध मनाची शुद्धता’ करण्याचा हा काळ आहे.