Pashankusha Ekadashi 2022 : आज आहे सर्व इच्छा पूर्ण करणारे पाशांकुशा एकादशी व्रत

पाशांकुशा एकादशीचे व्रत केल्याने भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Pashankusha Ekadashi 2022
Pashankusha Ekadashi 2022esakal

Pashankusha Ekadashi 2022 : साधारण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाशांकुशा एकादशीला भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Pashankusha Ekadashi 2022
Indira Ekadashi 2022: इंदिरा एकादशी दिवशी का करतात शाळीग्रामाची पूजा?

असे मानले जाते की, पाशांकुशा एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. जाणून घेऊया पापंकुशा एकादशीशी संबंधित कथा आणि तिचे महत्त्व.

Pashankusha Ekadashi 2022
Bhagwat Ekadashi: वारकरी संप्रदायात भागवत एकादशीला एवढं महत्त्व का?

पापंकुशा एकादशी व्रताचा शुभ मुहूर्त -

  • हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल,

  • दुसऱ्या दिवशी 06 ऑक्टोबर, गुरुवारी सकाळी 09:40 वाजता समाप्त होईल.

  • उदयतिथीनुसार पाशांकुशा एकादशीचे व्रत 06 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात येणार आहे.

  • या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा करावी आणि उपवास धरावा.

Pashankusha Ekadashi 2022
Smart Ekadashi 2022: अजा स्मार्त एकादशी व्रत महत्व, मुहूर्त आणि कहाणी

पाशांकुशा एकादशीचे महत्त्व -

धार्मिक श्रद्धेनुसार दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाशांकुशा एकादशीचे व्रत ठेवले जाते. श्री हरी भगवान विष्णूला समर्पित पाशांकुशा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे कल्याण होते. त्याला संपत्ती, सुख आणि सौभाग्य मिळते. पाशांकुशा एकादशी व्रताचे महत्त्व हिंदू धर्मात सांगितले आहे. पाशांकुशा एकादशी ही कठोर तपश्चर्येच्या समतुल्य मानली जाते. याद्वारे माणसाला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.

Pashankusha Ekadashi 2022
Kamika Ekadashi 2022: पापमुक्त व्हायचं? एकादशी व्रत करा, येतील शुभ संकेत

पाशांकुशा एकादशीची कथा -

पौराणिक कथेनुसार, क्रोधन नावाचा एक क्रूर शिकारी विंध्याचल पर्वतावर राहत होता. ज्याने आपल्या आयुष्यात सर्व वाईट गोष्टी केल्या होत्या. जेव्हा त्या शिकाऱ्याची शेवटची वेळ आली तेव्हा त्याला आणण्यासाठी यमराजांनी आपला सैनिक पाठवतात.

Pashankusha Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi : ‘आषाढी एकादशी’ महाराष्‍ट्रीयन संस्‍कृती साता समुद्रापार

क्रोधनाला मृत्यूची खूप भीती वाटत होती. म्हणून त्याने अंगारा नावाच्या ऋषीकडे मदतीची याचना केली. तेव्हा ऋषींनी त्याला पाशांकुशा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. पाशांकुशा एकादशीला त्यांनी भगवान विष्णूची पूजा केली. तेव्हा त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळाली, असे म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com