Pitru Paksh : निवृत्त पोलिसाने आई-वडीलांच्या आठवणीत बांधले मंदिर ; सर्वत्र होतेय कौतुक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pitru Paksh

Pitru Paksh : निवृत्त पोलिसाने आई-वडीलांच्या आठवणीत बांधले मंदिर ; सर्वत्र होतेय कौतुक!

पुणे : जगातील वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली जाते. काम संपले की वस्तू फेकून दिल्या जातात. असेच वय झालं की आई-वडील घरात नाही तर वृद्धाश्रमात सापडतात. नोकरीसाठी शहरात रहायचं म्हणून आलेले लोक तिथेच सेटल होतात. मात्र, आई बाबांना विसरून जातात. हे असे चित्र असताना कलियुगातील श्रावणबाळ चर्चेत आला आहे. या श्रावणबाळाने आई-वडीलांची सेवा तर केलीच. त्याचसोबत त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे मंदिरही बांधले.

तामिळनाडुमधील मदुराईत रहात असलेले रिटायर्ड पोलिस उपनिरीक्षक रमेश बाबू यांनी त्यांच्या आई-वडीलांचे मंदिर बांधले आहे. ते आई-वडीलांची रोज पूजाही करतात. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

याबद्दल रमेश असे सांगतात की, पोलिसाची नोकरी म्हणजे २४ तास ड्युटी. कामामुळे मला माझ्या कुटूंबाला कमी वेळ देता आला. माझ्या आई-वडीलांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले नाही. मी नोकरीवर असतानाच माझ्या आई-वडीलांचे निधन झाले. त्यामुळे रिटायर्ड झाल्यावर आई-वडीलांचे मंदिर बांधण्याचा मानस मी केला.

आई-वडीलांप्रती असलेली श्रद्धा काही पहील्यांदाच चर्चेत आली नाही. तर याआधी सांगली जिल्ह्यात एका मुलाने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण रहावी यासाठी सिलिकॉनचा पुतळा बनवला होता. त्याचे वडील पोलिसात होते त्यामुळे त्याने खाकी गणवेशातच वडीलांचा पुतळा बनवला.

काही दिवसांपूर्वी एका तरूणीच्या लग्नात तिच्या भावाने वडिलांचा मेणाचा पुतळा बनवला होता. त्या मुलीसाठी हा खूप भावूक क्षण होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Web Title: Pitru Paksh Retired Si Built A Temple Of His Parents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..