
Pitru Paksha 2025:
Sakal
पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या काळात पूर्वजांचे स्मरण आणि पूजा केली जाते.
काही खास दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे पितृपक्षात खरेदी करणे नुकसानकारक नाही, परंतु कुटुंबातील मान्यतेनुसार शुभ तिथींना खरेदी करावी.
Avoid Pitru Dosha while shopping during Pitru Paksha 2025: पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. ज्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण काळ पूर्वजांचे स्मरण, पूजा, पिंडदान इत्यादींसाठी असतो. तसेच पितृपक्षाबद्दल असेही मानलं जातं की या काळात खरेदी करणे टाळावे. या काळात काही खास दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे पूर्वजांकडून आशीर्वाद देखील मिळतात. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्याला पाहून आनंदी असतात. अशावेळी पितृपक्षात खरेदी करण्यात काहीही नुकसान नाही. त्यामुळे पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो. परंतु जर तुमची कुटुंबात पितृपक्षात खरेदी न करण्याची जुनी मान्यता असेल तर तुम्ही या काळात काही शुभ तारखांना खरेदी करू शकता.