

Pitru Paksha 2026: Origin & History of the Shraddha Tradition
esakal
Pitru Paksha: दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अन्न-जल अर्पण करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. मुळात 'श्रद्धा' या शब्दापासूनच 'श्राद्ध' या शब्दाची निर्मिती झाली आहे. मनात असणारा आदर आणि कृतज्ञतेची भावना विधीपूर्वक व्यक्त करणे म्हणजेच श्राद्धकर्म.
शास्त्रानुसार, सुपात्र व्यक्तीला आणि ब्राह्मणाला योग्य वेळी व ठिकाणी पूर्ण श्रद्धेने दिलेले दान म्हणजे श्राद्ध, अशी व्याख्या ब्रह्मपुराणात आढळते. पण, मानवी संस्कृतीत ही पद्धत नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, याचा रंजक इतिहास ब्रह्मांड पुराणात सांगितला आहे.