Pradosh Vrat 2022: सोम प्रदोष व्रत करतांना कोणती काळजी घ्यावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradosh Vrat 2022

Pradosh Vrat 2022: सोम प्रदोष व्रत करतांना कोणती काळजी घ्यावी?

Lord Shiva: आज प्रदोष व्रत आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातल्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. ज्या दिवशी प्रदोष व्रत पाळलं जातं, त्या दिवसाचं नाव त्याच्याशी जोडले जाते आणि त्या दिवसानुसार त्याचे फळ मिळते. सोमवारच्या दिवशी असणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असं म्हणतात. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं.

प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पूजा करण्याचे काही महत्वाचे नियम

1) शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालिग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते.

2) शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे.

3) शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो.

4) शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये.

5) शंखाचे पाणी शिवाला वाहू नये.

6) शिव पूजेमध्ये दुधाचा जलभिषेक केला जातो. लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. 

7) तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्या योग्य राहत नाही.

8) शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते.

9) शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. 

10) शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा.

भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. 

11) जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा. हे शिवपूजेचे महत्वाचे नियम आहेत. 

हेही वाचा: Datta Jayanti 2022: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे?

सोमप्रदोष व्रताच्या एक दिवस आधी तामसी भोजनाचा त्याग करावा. व्रतासाठी सर्वाधिक शुद्धतेला प्राधान्य द्यावे. प्रदोष व्रताच्या दिवशी आंघोळ करून पूजास्थान स्वच्छ करावं. नंतर व्रत व शिवपूजनाचा संकल्प करावा. तुम्हाला सकाळी पूजा करायची असेल, तर सकाळीच पूजेला सुरुवात करा. कारण या वेळी सर्वार्थ सिद्धी योग आहे. प्रदोष काळात पूजा करायची असेल, तर मात्र रोजची सकाळची पूजा आधी करून घ्यावी. तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची असेल तर दिवसभर फळं खावीत, शिवभक्तीत वेळ घालवावा. घरामध्ये शुभ मुहूर्तावर भगवान शंकराचा फोटो लावा किंवा शिव मंदिरातल्या शिवलिंगाची पूजा करावी.

हेही वाचा: Datta Jayanti 2022: दत्तजन्माची पौराणिक कथा काय आहे?

आता बघू या पूजा कशी करावी?

सर्वप्रथम भगवान शंकराला गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करा. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून अक्षता, बेलाची पानं, पांढरं चंदन, भांग, धोत्रा, धूप, मध, साखर, पांढरी फुलं, फळं इत्यादी अर्पण करा.यानंतर भगवान शंकराला धूप, दिवा दाखवा. नंतर शिवचालिसा आणि सोम प्रदोष व्रत कथा याचं पठण करावं. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही कोणत्याही शिव मंत्राचा 108 वेळा जप करू शकता.

हेही वाचा: Datta Jayanti 2022: दत्तात्रेय यांचे 52 श्लोकी गुरुचरित्र...

पूजेच्या शेवटी भगवान शंकराची आरती करा. भगवान शंकरासमोर तुमची इच्छा व्यक्त करा, क्षमा मागा. त्यानंतर प्रसादाचं वाटप करावं. व्रतामध्ये दान करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू दान करायच्या आहेत, त्या काढून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वस्तू ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला दान करा.दान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा करून पारण करावं. काही जण उपवासाच्या दिवशी रात्रीच पूजा करून पारण करतात. तुमच्याकडे ही प्रथा असेल, तर तसं करण्यास हरकत नाही. तुम्ही शिवमंदिरात पूजा करत असाल, तर नंदीचीदेखील पूजा करा. नंदी भगवान शंकराला सर्वांत प्रिय आहे.

टॅग्स :culturelord shivHistory