Pradosh Vrat katha: प्रदोष म्हणजे काय ? आणि प्रदोषाचे व्रतवैकल्य कसे करावे?

प्रदोष कथा, या दिवशी काय खावे काय खाऊ नये याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
Pradosh Vrat katha
Pradosh Vrat kathaसकाळ डिजिटल टीम

Pradosh Vrat katha: पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष कालात पूजेची वेळ वेगळी असते. तसे, सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादीं आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे. यानंतर हळदीकुंकवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या. त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करा.

दर महिन्यात दोन प्रकारच्या एकादशी असतात. त्याच प्रकारे दोन प्रकारचे प्रदोष देखील असतात. त्रयोदशीला प्रदोष म्हणतात. एकादशीला विष्णू तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही व्रतांमुळे चंद्र दोष दूर होतो अस सांगितले जाते.

Pradosh Vrat katha
Photos : विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, एकादशीनिमित्त फुलांची आरास

प्रदोष व्रत कथा (Pradosh Vrat katha)

पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले. हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विषेश महत्त्व आहे.

Pradosh Vrat katha
Ashadhi Ekadashi 2022: उपवास करताना 'या' पाच गोष्टींची काळजी तुम्ही घेता का?

प्रदोष व्रत : काये खावे काय खाऊ नये?

1) प्रदोष काळात उपवास असताना फक्त हिरवे मूग खाल्ले पाहिजे. हिरवे मूग पृथ्वी तत्त्व आहे आणि ते मंदाग्निला शांत ठेवण्यास मदत करतात.

2) प्रदोष काळात लाल मिरची, धान्य, तांदूळ, आणि साधं मीठ खाणे टाळावे. तुम्ही पुर्ण निरंकार उपवास करु शकता किंवा फळाहार देखील घेऊ शकता.

प्रदोष व्रत विधी ( Pradosh Vrat Vidhi)

व्रत असलेल्या दिवशी सुर्योदयापूर्वी उठावे. नित्यकर्म आटपून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. पुजेची तयारी करावी. गायीच्या शेणाने मंडप तयार करावा. मंडपाखाली 5 वेगवेगळ्या रंगाची रांगोळी काढावी. नंतर उत्तर पूर्व दिशेकडे मुख करुन महादेवाची पूजा करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com