
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात महाकुंभची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या कुंभमेळ्याला ४० कोटींपेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध हवा व आरोग्यदायी वातावरण मिळावे म्हणून प्रयागराजमध्ये ठिकठिकाणी दाट जंगलाची निर्मिती करण्यात आली आहे.