‘ज्ञानरूपी वसा’ गेला कुठे?

क्लासचालकांच्या मर्जीतील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते थेट बेकायदा
‘ज्ञानरूपी वसा’ गेला कुठे?

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील अकरावी प्रवेशावर खासगी शिकवण्यांचे वर्चस्व वाढत चालले आहे. क्लासचालकांच्या मर्जीतील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते थेट बेकायदा परस्पर करार करण्यापर्यंतचे प्रकार वाढले आहेत. अप्रत्यक्षरीत्या अकरावी प्रवेशावर जणू क्लासचालकांचे नियंत्रण असून, यात सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जात आहे.

सध्याचे चित्र...

दर्जेदार शिक्षण आणि नावलौकीक असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्येही हा प्रकार वाढल्याचे निदर्शनास शिकवणी आणि तयारी खासगी क्लासेसमध्ये, फक्त परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयांचा वापर, हे समीकरण आता वाढते आहे

याबद्दल खुलेपणाने बोलण्यासही शिक्षक धजत नाहीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी खासगी शिकवण्या लावतात. त्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून, वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीत सूट देणाऱ्या आणि क्लासचालकांच्या मर्जीतील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेतात.

फक्त प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयात उपस्थिती. इतर वेळ खासगी क्लासेसला विद्यार्थी जातात. काही महाविद्यालयांनी तर थेट खासगी क्लाससोबत अवैध करार केले असून, पालकांचीही याला मूक संमती दिसते लाखो रुपये शुल्क आकारणाऱ्या या क्लासचालकांमुळे सर्वसामान्यांची फरफट

भयानक चित्र

पुणे शहरातील मध्यवस्तीतील एका कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सांगतात, ‘‘प्रवेशाची चौथी फेरी होऊन गेले तरी आमच्या निम्याहून अधिक जागा अजून शिल्लक आहे. विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घ्यावा म्हणून अनेक विद्यालयांचे उंबरे आम्ही झिजविले. मात्र विद्यार्थी क्लासचालकांच्या मर्जीनुसारच प्रवेश घेत असल्याचे आमच्या लक्षात आहे. त्यामुळे काही क्लासेससही आम्ही गाठले. पण आम्ही वर्गातील उपस्थितीत सवलत देत नसल्यामुळे विद्यार्थी तुमच्याकडे प्रवेश घेत नाहीत, असे त्यांनी सांगितले.’’

खासगी शिकवण्यांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी करार केल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. असे काही निदर्शनास आल्यास आम्ही कडक कारवाई करू.

- औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक, पुणे

मूल्यशिक्षणाचा बळी

फक्त स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करतात. क्लासेस संस्कृतीमुळे पालकांचे आर्थिक शोषण तर होते, त्याचबरोबर पुस्तकाव्यतिरिक्तच मूल्यशिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहे. क्रीडा, अभिनय, ललित, वत्कृत्व, व्यवस्थापन अशा स्पर्धांपासून विद्यार्थी दुरावले जात आहे. क्लाससंस्कृतीमुळे येत्या काळात कनिष्ठ महाविद्यालये फक्त नावापुरतेच उरतात की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

परंपरा

गुरुकुल शिक्षणाचा कालावधी अदमासे कौटिल्य आधीचा आहे. या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यास शिक्षकाच्या घरी, त्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकास ‘गुरू’ तर विद्यार्थ्यास ‘शिष्य’ हे संबोधन वापरले जात असे. वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षी गुरूंकडे पाठविण्याचा प्रघात होता.

हे शिक्षण सुमारे १२ वर्षे चाले. या शिक्षण पद्धतीत अनेक विद्यांचा समावेश होता. विद्याभ्यास, शस्राभ्यास, योगाभ्यास अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे.

गुरूंच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामांत मदत करावी लागे. कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण बनवणे अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश असे. ही पद्धत पूर्ण भारतात प्रचलित होती. नंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासांपुरती मर्यादित राहिली.

या परंपरेत गुरू शिष्याकडून कोणतेही मूल्य घेत नसे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरूंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असत. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे.

विविध शास्त्रांचा अभ्यास येथे होत असे. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, वेदशास्त्र तसेच योग विद्यांचा अभ्यासही येथे होत असे.

विविध शस्त्रांचा अभ्यास येथे होत असे. वैदिक विद्या, विधिविद्यासारख्या विविध विद्यांचा अभ्यासही शिष्यांकडून करून घेण्यात येत होता.

विद्यार्थ्यांनो, व्यक्त व्हा!

विनोबा भावे यांनी गीतेवर प्रवचने देताना म्हटले आहे, ‘‘लोक निराधार असतात, त्यावेळेस त्यांची सेवा करून त्यांना सुखी करणे हा ओघप्राप्त धर्म आहे. आपल्या कुटुंबाची सेवा करताना जितका स्वार्थ आपण निर्माण करतो तितका सर्व लोकसेवेतही आपण निर्माण करू.’’ आजकाल शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे, तो पाहता आपण कुठे चाललो आहोत, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण याला एकच घटक जबाबदार नाही. अकरावी प्रवेशावर खासगी शिकविण्यांच्या अतिक्रमणाबद्दल तुम्हाला काय वाटते? यात सर्वसामान्य विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या भरडला जाईल का?... तुमचा अनुभव व प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com