Rahu Chandra Yuti 2026
esakal
ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. सध्या चंद्र आणि राहू यांची कुंभ राशीत युती झाली आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. तर राहूला मायावी ग्रह म्हटलं जातं. १७ नोव्हेंबरपासून १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चंद्र कुंभ राशीत राहणार आहे. या काळात राहू आणि चंद्र एकाच राशीत असल्याने विशेष युती तयार झाली आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, या ग्रहस्थितीचा चार राशींच्या लोकांना चांगला फायदा मिळू शकतो. काहींना आर्थिक लाभ, तर काहींना करिअर आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.