दीड वर्षानंतर राहू-केतू बदलणार राशी! ५ डिसेंबरपासून ६ राशींचं नशीब चमकणार, नेमका काय बदल घडणार?

Rahu Ketu Transit 2026 : राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हटलं जातं. राहूचा संबंध महत्त्वाकांक्षा, अचानक होणारे बदल आणि भौतिक सुखांशी जोडला जातो. तर केतूला वैराग्य, अध्यात्म आणि आत्मचिंतनाचा कारक मानलं जातं.
Rahu Ketu Transit 2026

Rahu Ketu Transit 2026

esakal

Updated on: 

२०२६ वर्ष संपण्यापूर्वी राहू आणि केतू हे दोन महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. जवळपास दीड वर्षानंतर होणारा हा बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. द्रिक पंचांगानुसार, ५ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी राहू-केतूचे गोचर होईल. यावेळी राहू कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल, तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत जाईल. दोन्ही ग्रह एका राशीत साधारण १८ महिने राहतात. त्यामुळे त्यांच्या राशीबदलाचा परिणामही दीर्घकाळ जाणवू शकतो. या गोचराचा सर्व १२ राशींवर परिणाम होणार असला, तरी वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन या सहा राशींसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो.

Loading content, please wait...