Rahu Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रात राहूच्या गोचराला विशेष महत्त्व दिलं जातं. राहू हा नेहमी वक्री गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्वच राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. सध्या राहू कुंभ राशीत असून, लवकरच तो शनीच्या दुसऱ्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे राहू आणि शनी यांच्यात मित्रत्वाचं नातं असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. त्यामुळे या गोचरात शनीचाही प्रभाव पाहायला मिळू शकतो.