
राजुर, (ता. भोकरदन, जि. जालना) : अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. १२) भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील महागणपती राजुरेश्वर देवस्थान सज्ज झाले आहे. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी व्यवस्थेसह अन्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण होत आली आहे.