Raksha Bandhan : बहिणीला खुश करायचं आहे ना? मग 'या' आर्थिक भेटवस्तू द्या

आज आम्ही तुम्हाला अशाच काही अनोख्या भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत...
Raksha Bandhan 2022 economic gift
Raksha Bandhan 2022 economic gift
Summary

आज आम्ही तुम्हाला अशाच काही अनोख्या भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत...

ऑगस्ट महिन्यापासून देशभरातील सर्वच राज्यात सण-उत्सवांची सुरुवात होते. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2022) उद्या साजरा होत आहे. संबंध देशभर हा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट्स, शॉपिंग मॉल्स अशी खरेदीची ठिकाण सज्ज झाली आहेत. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. आणि बदल्यात बहिणींना भावांकडून भेटवस्तू दिली जाते अशी परंपरा आहे. (raksha bandhan 2022 financial gift)

आज आम्ही तुम्हाला अशाच काही अनोख्या भेटवस्तूंबद्दल (बहिणींसाठी रक्षाबंधन गिफ्ट आयडियाज) सांगणार आहोत, जे तुमच्या बहिणींना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आजच्या डिजिटल जगात 'फायनान्शियल फ्रीडम' ही लोकप्रिय संज्ञा बनली आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिक स्वातंत्र्यासंदर्भातील एखादी भेटवस्तू देऊ शकता. यामुळे कोणत्याही आपत्कालीन संकटात तुमची भेट तिच्या कामी येऊ शकते. वैयक्तिक विमा, वैद्यकीय विमा अशी एखादी खास भेट तुम्ही बहिणाला देऊ शकता.

Raksha Bandhan 2022 economic gift
Raksha Bandhan 2022 : भावाला राखी बांधताना पूजेच्या ताटात या गोष्टी आवर्जून असाव्या

मुदत ठेव (FD)

मुदत ठेव ही भारतीयांची पसंतीची गुंतवणूक पद्धत आहे. गुंतवणुकीचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये परतावा तुलनेत कमी असला तरी रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने एफडीवरील व्याजही वाढत राहते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावावर बँकेत ठराविक रकमेची एफडी ठेवू शकता. यामुळे तुमच्या बहिणीला येणार्‍या काळात मोठी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

म्युचल फंड

तुम्हाला एकरकमी मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची नसेल किंवा तुमच्याकडे एकाच वेळी मोठ्या भेटवस्तू देण्याचा पर्याय नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडचा आधारा घेऊ शकता. तुमच्या बहिणीच्या नावे तुम्ही म्युच्युअल फंड सुरू करू शकता. यात तुम्ही हळूहळू हप्त्याने पैसे जमा करू शकता. भविष्यात तुमच्या बहिणीला याचा चांगला परतावा मिळू शकेल.

Raksha Bandhan 2022 economic gift
श्रावणसरींनी दिलेल्या उघडीपमधील ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेत अमाप उत्साह

वैद्यकीय विमा

वैद्यकीय उपचार सध्या महाग झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या अनिश्चित जीवनात जीवन सुरक्षित करण्यासाठी आरोग्य विमा ही सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. एक-दोन दिवस रुग्णालयात दाखल केले तर हजारो रुपयांचे बिल होते. अशा परिस्थितीत आरोग्य विमा उपयोगी येतो. त्यामुळे तुमच्या बहिणीसाठी आरोग्य विमा हेही रक्षाबंधन भेटवस्तू म्हणून उत्तम पर्याय बनू शकतो.

डिजिटल गोल्ड

रक्षाबंधन भेट देण्यासाठी सोने खरेदी करणे म्हणजे सोन्याची नाणी किंवा दागिने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोने खरेदीच्या बाबतीत बऱ्याचवेळा ते हरवणे किंवा चोरीला जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी डिजिटल सोने खरेदी करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. गरज पडल्यास काही मिनिटांत डिजिटल गोल्ड विकून कॅश घेतली जाऊ शकते. या कारणास्तव बहिणीला सोन्याचे दागिने देण्याऐवजी डिजिटल सोने म्हणजेच कागदी सोने भेट देणे हा उत्तम पर्याय आहे.

Raksha Bandhan 2022 economic gift
Raksha Bandhan : रक्षाबंधनला भावाचं तोंड गोड करणारी 'कलाकंद' रेसिपी, १५ मिनीटांत घरीच बनवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com