
Astrological remedies for peaceful Raksha Bandhan celebrations: रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या अतूट, प्रेमळ नात्याला साजरा करण्याचा सण आहे. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊदेखील बहिणीचे नेहमी रक्षण करण्याचे वचन देतो. यामुळे दोघही बहिण भावांचं नातं अजून घट्ट होतं. पण, यावर्षी राहूच्या विशेष ग्रहास्थितीमुळे काही राशीच्या व्यक्तींवर भावनिक आणि नात्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. राहू कुंभ राशीत तर शनि मीन राशीत वक्री अवस्थेत असणार आहे. यामुळे काही अडथळे निर्माण होऊ शकतात. अशावेळेस काही राशींनी विशिष्ट उपाय केले तर हे तणावपूर्वक वातावरण टाळता येऊ शकते आणि सणाचा आनंद देखील घेता येईल.