
Rama Eakadashi 2025:
Sakal
Rama Ekadashi 2025 Date and Parana time: पंचागानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला 'रमा एकादशी' साजरी केली जाते. यंदा १७ ऑक्टोबरला रमा एकादशी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या आधी रमा एकादशी साजरी केली जाते. या दिवशी विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पूजा केल्यास पापांपासून मूक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते. जर तुम्ही रमा एकादशीचे व्रत करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.