Ramadan 2023 : महिनाभराचे रोजे आजारापासून ठेवतात दूर, धार्मिकतेबरोबरच आरोग्यदायी फायदे

जेवणातील हे लांबलचक अंतर आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असल्याचे सांगण्यात येते
Ramadan 2023
Ramadan 2023esakal

Ramadan 2023 : मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात जवळपास महिनाभर रोजे ठेवून अल्लाहची प्रार्थना केली जाते. २२ एप्रिलला रमजान असल्याने आता रोजेही अंतिम टप्प्यात आले आहेत. या काळात उपवास ठेवण्याचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. रमजानमध्ये इस्लामला मानणारे लोक सुमारे १२ ते १५ तास उपवास करतात. या काळात उपवास करणारी व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अशी दोनच वेळा अन्न ग्रहण करते. जेवणातील हे लांबलचक अंतर आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असल्याचे सांगण्यात येते.

शरीर ‘डिटॉक्स’

उपवास केल्याने आपले शरीर डिटॉक्स होते. यामागील कारण म्हणजे उपवासाच्या वेळी आपल्या पचनसंस्थेला विश्रांती घेण्याची पूर्ण संधी मिळते. उपवासाच्या वेळी पचनसंस्थेला जेवढे काम करावे लागते तेवढे काम सामान्य दिवसांत करावे लागत नाही. यामुळे, शरीर डिटॉक्स करण्यास आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडण्यास सक्षम होते.

Ramadan 2023
Ramadan 2023

वाईट सवयी सोडा

उपवास पाळणे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर या काळात इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला दिला जातो. अशा स्थितीत जर एखाद्याला असे कोणतेही व्यसन असेल जे आरोग्यास हानिकारक असेल तर रमजानच्या महिन्यात तो त्यापासून सहजपणे मुक्त होऊ शकतो. उपवास केल्याने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. (Health Benefits)

Ramadan 2023
Ramadan Special : रमजान स्पेशल डीश, इफ्तारीसाठीची बनवा इंस्टंट एनर्जी देणारे अंडा पकोडे!

याची काळजी घ्या

काही गोष्टींची काळजी घेतली तरच रमजानमध्ये (Ramadan) उपवास करून तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. रमजानच्या दरम्यान अधूनमधून उपवास करण्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी, इफ्तारच्या वेळी तळलेले अन्न खाणे टाळा.

Ramadan 2023
Ramdan 2023 : रमजान सुरू होताच खजुरांची मागणी वाढली; किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ!

वजन कमी होण्यास मदत

आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे, बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा वेळी उपवास करून वजन कमी करता येते. उपवासात तुमचे पोट १२-१५ तास रिकामे राहिल्याने कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. आपल्या पचनसंस्थेला विश्रांतीची संधी मिळते, मेटाबॉलिज्मला चालना मिळते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com