Ramzan Eid 2023 : फक्त डोळ्यांच्या पापणीनेही तुटू शकतो रोजा... नक्की काय म्हणतात मौलवी?

रोजा करणं नक्कीच सोप्पं नाही, त्यात खूप काळजी घ्यावी लागते. हे करणाऱ्यांनी अनेक गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे
Ramzan Eid 2023
Ramzan Eid 2023esakal

Ramzan Eid 2023 : रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानचा महिना संपल्यानंतर ईदचा सण साजरा केला जाणार आहे. रमजानच्या महिन्यात अनेक लोकं उपवास ठेवतात, याला आपण रोजा म्हणत असतो. रोजा करणं नक्कीच सोप्पं नाही, त्यात खूप काळजी घ्यावी लागते. हे करणाऱ्यांनी अनेक गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास उपवास करणाऱ्याचा उपवास मोडू शकतो.

या महिन्यात लोक केवळ उपवासच ठेवत नाहीत तर खऱ्या मनाने अल्लाहची भक्ती करतात. उत्तर प्रदेशातील डासना येथील जामिया सबीरूर रशाद मदरशाचे संचालक मौलाना अशरफ म्हणतात की रमजानचा महिना आशीर्वादांनी भरलेला आहे. अल्लाह या महिन्यात आपली विशेष कृपा दाखवतो. मौलाना अश्रफ पुढे म्हणाले की, या महिन्यात अल्लाह पापांची क्षमा करतो. तो प्रार्थना स्वीकारतो आणि देवदूतांना रोजा ठेवणाऱ्यांच्या प्रार्थनेला आमिन म्हणण्याचा आदेश देतो.

Ramzan Eid 2023
Ramzan Eid 2023 : शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा तडका; खरेदी- विक्रीवर परिणाम

जो व्यक्ती अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी श्रद्धेने रोजा ठेवतो, अल्लाह त्याचे मागील सर्व पाप माफ करतो. या महिन्यात मुस्लिम जनतेने गरीब आणि दीनदुबळ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

पण, जे लोक उपवास करतात, त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही वेळा छोट्याशा चुकीने उपवास तुटतो, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून सेहरीपासून इफ्तारपर्यंतचा वेळ घालवणे आवश्यक आहे.

Ramzan Eid 2023
Ramzan eid 2023 : रमजान ईदसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी...

या छोट्या-छोट्या चुकांमुळे रोजा तुटतो

मौलाना अश्रफ यांनी स्पष्ट केले की रोजा तुटण्याची अनेक कारणे असू शकतात.

1. डोळ्यांची पापणी ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्याने एखाद्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले तर रोजा तुटू शकतो.

2. खोटे बोलून किंवा पाठीमागे दुष्कृत्य करण्यानेही रोजा तुटतो.

3. सेहरीनंतर किंवा इफ्तारपूर्वी जे जाणूनबुजून काहीही खातात किंवा पाणी पितात त्यांचाही रोजा तुटू शकतो.

4. जर रोजा करणाऱ्याच्या दातांमध्ये काही अन्न अडकले असेल आणि त्याने ते आतून गिळले तर त्यामुळेही रोजा तुटू शकतो.

5. एखाद्याला शिवीगाळ करणे, वाईट शब्द बोलणे किंवा आजारपणाशिवाय अनावश्यक इंजेक्शन घेणे यामुळे देखील उपवास मोडतो.

Ramzan Eid 2023
Ramzan eid 2023 : कल्मी, किमीया, झैदी खजूरला अधिक पसंती

रोजा करतांना कशी घ्यावी शरीराची काळजी?

रोजा ठेवणाऱ्या व्यक्तींनी या दिवसांमध्ये वर्कआऊट करताना थोडी काळजी घेण्याची गरज असते. कारण या काळात तुमच्या शरीरातील ऊर्जेचा स्तर एकसमान नसतो, यात चढ-उतार होत असतात.

पर्सनल ट्रेनर बिलाल हाफीज आणि डायटिशियन, न्यूट्रीशनिस्ट असणाऱ्या नाझिमा कुरेशी, हे दोघेही पती-पत्नी 'द हेल्दी मुस्लिम' म्हणून ओळखले जातात. उपवासाच्या वेळी शरीराच्या गरजा काय असतात या विषयातले हे तज्ञ आहेत. या दोघांनी मिळून 'द हेल्दी रमझान गाईड' हे पुस्तक लिहिलंय. रोजा ठेवताना व्यायाम आणि खाण्याच्या सवयींविषयीची माहिती या पुस्तकात देण्यात आलीय.

Ramzan Eid 2023
Ramzan Eid Festival : ‘रमजान ईद’च्या खरेदीने बाजारपेठ गजबजली!

हाफिज सांगतात, "रमझानमध्ये रोजा ठेवण्याचा मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे प्रार्थना करणे, आध्यात्मिक राहणे आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करणे. या पूर्ण महिन्यात जास्तीत जास्त उपवास ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशात आपण नेमका काय आहार घेतो, आपण कोणता व्यायाम करतो हे महत्वाचं ठरतं. आपल्या तणावाची पातळी, कामाचं संतुलन आणि कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेवरही याचा मोठा प्रभाव पडतो."

Ramzan Eid 2023
Ramzan Eid : रमजान पर्वाची चाहूल लागताच पूर्वतयारीस वेग

व्यायाम कोणत्या वेळी करावा...

हाफिज सांगतात, "बहुतेक लोक उपवास सोडण्यापूर्वी एक किंवा दोन तास व्यायाम करतात जेणेकरुन त्यांची एनर्जी कमी होईल आणि ते जास्त खाऊ पिऊ शकतील. पण जर हे तुमच्या रुटीन मध्ये बसत नसेल तर तुम्ही तुमचं नेहमीचंच रूटीन फॉलो करा."

"गेल्या वर्षी मी दुपारी वर्कआऊट केला होता. त्यानंतर माझी एनर्जी लेव्हल खूप वाढायची. पण सुरुवातीच्या दिवसांत हे थोडं अवघड वाटू शकतं, पण शरीर लवकरच या सगळ्यांशी जुळवून घेतं. रोजे सोडल्यानंतरही तुम्ही वर्कआऊट करू शकता, पण ही वेळ नमाज अदा करण्याची असते. त्यामुळे वेळ काढणं अवघड होऊन बसतं."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com