Ramzan eid 2023 : कल्मी, किमीया, झैदी खजूरला अधिक पसंती

खजूर @ १४०० रुपये किलो; रमजानसाठी ड्रायफ्रूटने बाजार सजला
खजूर
खजूरsakal

नागपूर : रमजानचा महिना सुरू झाला असून त्यानिमित्त लागणारे विविध साहित्य तसेच खाद्य पदार्थ हे बाजारात दाखल झाले आहेत. रमजानमध्ये जो दिवसभर रोजा (उपवास) केला जातो. तो खजूर खाऊन सोडतात. याच खजुराचे अनेक प्रकार हे सध्या शहरातील विविध बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहे. खजुराची आवक कमी असल्याने टंचाई जाणवू लागली आहे. मगजोल खजूर १४०० रुपये तर अजवा खजूर १२५० रुपये किलो आहे.

बाजारात अज्वा, मुज्जरब, कलमी, मदिना, मगजोल, फरत, सुलतान, सगाई, अंबर, केमिया, मरुकसार, हसना, सफाया, बुरारी असे विविध प्रकारचे खजूर आले आहेत. मागणी अधिक

कल्मी, किमीया, झैदी खजूरला अधिक मागणी

आणि आवक कमी असल्याने खजुराची कमतरता बाजारात जाणवत आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या २० ते ३० रुपयांची दरवाढ झालेली आहे. मागणी वाढलेली असताना आवक मंदावल्यास पुन्हा भाव वाढू शकतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

खजूर
Nagpur : जीवनावश्‍यक औषधी महागणार ; राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणाचे संकेत

रमजानमध्ये खजुराचे महत्त्व

रमजान महिन्यात खजुराला खूपच जास्त महत्त्व असून, या दिवसात उपवास सोडण्यासाठी त्याचा अधिक वापर केला जातो. इस्लाममध्ये रमजान महिन्यात खजुराचे महत्त्व सांगितले आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या महिन्यात खजूराचा वापर करत असतात. सध्या बाजारात इतवारी, मोमीनपुरा, सदर आदी परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी रमजानचे रोजे सोडण्याकरिता विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. नागरिक रमजानच्या आधीच यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून ठेवतात. बाजारात रात्री गर्दी वाढू लागली आहे.

खजूर
Nagpur News: सिर्फ बॉटल उठानेवालाही आता है यहाँ!

अत्तर, टोपी, सुरमालाही पसंती

रमजानमध्ये खजूर व इतर खाद्य पदार्थांशिवाय अत्तर, टोपी, सुरमा तसेच इबादतसाठी लागणाऱ्या विविध साहित्याला देखील जास्त मागणी असते. याची देखील दुकाने थाटलेली पाहायला मिळत आहे.

कल्मी, झौदी खजुराला अधिक पसंती

शहरात जगभरातील विविध देशांमधून खजूर येतात. त्यात प्रामुख्याने सौदी, इराण, इराक या ठिकाणाहून खजूर हे जास्त प्रमाणात येतात. कलमी, सुक्री, अजवा हे खजूर सौदी येथून येतात. तर झैदी, किमिया हे खजूर इराणवरून येतात. तर काही खजूर हे इराकवरून येतात. कलमी खजूर हा ७०० ते ७५० रुपये किलो आहे.

तर फरद हे ३०० रुपये किलो, सर्वात महाग खजूर मगजोल १४०० रुपये किलो तर अजवा खजूर १२५० रुपये किलो आहे. बाजारात कल्मी, किमीया, झैदी या खजूरला अधिक मागणी असते. सध्या बाजारात १६० ते १४०० रुपये किलोपर्यंतचे विविध खजूर आहेत, असे ड्रायफ्रुटचे विक्रेते किरण दप्तरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com