

rare Panchgrahi Yoga benefits for zodiac signs 2025: यंदा हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी केली जाणार आहे. यावेळी 57 वर्षानंतर या दिवशी ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे. मीन राशीत एकाच वेळी 5 ग्रहांचे भ्रमण होत असून 4 मोठे राजयोग तयार होत आहेत. यामुळे या शुभ दिनाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. शुक्र ग्रह उच्च राशी मीन राशीत भ्रमण करत असताना दुर्मिळ योग निर्माण तयार होत आहे. तसेच, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राज योग तयार होत आहे. मीन राशीत चार राजयोगांच्या महान योगायोगामुळे, हनुमान जयंतीचा सण पुढील राशींसाठी लाभदायी ठरणार आहे.