
महाकुंभनगर : जगातील सर्वांत मोठा धार्मिक कार्यक्रम असणारा महाकुंभ प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाकुंभमध्ये भाविकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कापडी पिशव्या, स्टीलची ताटे व ग्लास वाटले जात आहेत, अशी माहिती स्वयंसेवकांनी दिली.