
Sankashti Chaturthi 2025 Abroad:
Sakal
संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांनी भगवान गणेशाची पूजा करून संकटांपासून मुक्तता मिळवावी.
परदेशात राहणाऱ्या भक्तांसाठी चंद्रोदयाची वेळ आणि उपवास सोडण्याची माहिती पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिली आहे.
आश्विन महिन्यातील संकष्टीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात.
Sankashti Chaturthi vrat rules and moon sighting abroad: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा केली जाते तसेच आवडणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्यानं जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळते आणि सुख-समृद्धी मिळते. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपैकी आश्विन महिन्यातील संकष्टीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात. परदेशातील गणेश भक्तांनी संकष्टी चतुर्थी कधी साजरी करावी आणि उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ कोणती याबाबत सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाकर्ते गौरव देशपांडे यांनी माहिती दिली आहे.