मुक्ताईने माऊलींसह तिघाही बंधूंना बांधली राखी

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan 2022esakal

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : हिंदू धर्म संस्कृती अनेकविध रूढीपरंपरा व्रतवैकल्य यांनी नटलेली आहे. बहिणभावाचे नाते घट्ट विणणारा प्रेमाचा धागा असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होतो. (Latest Marathi News)

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan: मुलीने शोधले चक्क 40 बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू

संत परंपरेतील संत मुक्ताबाई आपल्या संत भावास निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना बालपणात बांधणारी राखीची अतूट प्रेमाचे बंधनाची परंपरा संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरने आजही सांभाळली आहे.
रक्षाबंधनानिमित्त संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रतिनिधी पाठवून त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड, आपेगाव या समाधीस्थळावर जाऊन तिघही बंधूना राखी बांधण्यात आली.

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan 2022 : भद्रा काळ म्हणजे काय, या चार राशींवर अधिक प्रभाव

रक्षाबंधन पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील व अंकिता पाटील यांनी मुक्ताईची राखी विधिवत पूजनाने माऊलींना बांधली. या वेळी विशाल महाराज खोले सागर महाराज लाहूडकार, दीपक महाराज, आळंदी देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व भाविक हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com