
Raksha Bandhan: मुलीने शोधले चक्क 40 बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू
चाळीस बहिण भाऊ असल्याचे सांगणारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या मुलीच्या मते तिला ४० बहिण भाऊ आहेत. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. या मुलीचे वडिल हे स्पर्म डोनर होते. तिच्या मते तिच्या बहिण भावांची संख्या १०० पण असू शकते. क्रिसटा बिलटन असे या मुलीचे नाव आहे. (A woman whose biological father was a sperm donor has tracked down 40 siblings with the same father.)
क्रिस्टाने 'A Normal Family: The Surprising Truth About My Crazy Childhood' तिच्या या पुस्तकात याबद्दल खुलासा केलाय. यात तीने तिचे वडिल स्पर्म डोनर असल्याचे सांगत आपल्याला १०० भावंड असू शकतात असं ती म्हणाली आहे.
क्रिस्टा म्हणते की कदाचित मी माझ्या एखाद्या भावाला डेट केले असावे. सध्या ती विवाहीत आहे. तिने एका ब्रिटीश पत्रकारासोबत लग्न केले.क्रिस्टा म्हणते की तीला वयाच्या २३ व्या वर्षी माहिती पडले की तिचे वडिल हे अनेक लोकांचे वडिल आहे. म्हणजेच ते स्पर्म डोनर होते. क्रिसटाच्या आईला १९८० मध्ये त्यांनी स्पर्म डोनेट केले होते.तिच्या आईने तिला याबद्दल सांगितले.
क्रिस्टा समोर सांगते, हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा स्पर्म डोनेशनवर रेगूलेशन नव्हते.तिची आई लेस्बियन होती.तिला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते. क्रिस्टाने तिचे अनेक अनुभव पुस्तकात सांगितले.ती तिच्या ४० भाऊ बहिणीला ओळखते पण तिच्या मते तिला १००हून अधिक बहिण भाऊ असू शकतात. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत