
Sapahla Ekadashi 2022: आज सफला एकादशीचा शुभ योग! या राशींना मोठा फायदा; जाणून घ्या मुहूर्त
Saphala Akadashi Date: हिंदू धर्मात एकादशीला फार महत्व आहे. वर्षाला एकून 24 एकादशी असतात. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथिला सफला एकादशी म्हणतात. ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी असते. यावेळी ही एकादशी 19 डिसेंबरला म्हणजेच आज असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तीन राशींसाठी चांगला योग निर्माण होणार आहे.
शिवाय या दिवशी जो व्यक्ती प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने व्रत करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते. चला तर तीन शुभ योग असणाऱ्या राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

१. वृषभ राशी
सफला एकादशीच्या दिवशी वृषभ राशीला चांगलाच फायदा होणार आहे. पार्टनरशिपमध्ये या राशीच्या लोकांना लाभ होऊ शकेल. करियर क्षेत्रात चांगेल परिणाम दिसतील. खर्चांवर नियंत्रण असेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. प्रकृतीतही सुधार होईल. आर्थिक लाभ होईल.
२. सिंह राशी
तीन योगांमुळे सिंह राशीच्या लोकांची वेळ चांगली असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकाऱ्यांची मदत प्राप्त होईल. तुम्ही शत्रूंचा सहज सामना करू शकाल. प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम प्राप्त होईल. शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करू इच्छिणाऱ्यांनाही लाभ होईल.
३. तूळ राशी
सफला एकादशीला लक्ष्मी नारायण योगमुळे तुळ राशीसाठी हा दिवस शुभ असणार आहे. ज्यामुळे तुमच्या धनातही वृद्धी होईल. अनेक वर्षापासून असलेला आजारही बरा होईल. खर्च नियंत्रणात राहील. नव्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. यावेळी पदोन्नतीचे योग जुळून येतील.
४. धनु राशी
एकादशीच्या दिवशी बुधादित्य योगामुळे धनू राशीच्या लोकांना बंपर लाभ होईल. आर्थिक गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असेल. उच्च अधिकाऱ्यांकडून सहकाऱ्यांना सहयोग प्राप्त होईल. यावेळी देण्याघेण्यापासून सावध राहा. शत्रूंपासून सावध राहा.
सफला एकादशी शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगनुसार, पौष महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीला एकादशी साजरी केली जाते. या मुहूर्ताची सुरूवात 19 डिसेंबरला 3 वाजून 32 मिनिटांनी सुरू होऊन 20 डिसेंबरला 2 वाजून 32 मिनीटांनी संपेल.