Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saturday Astro Tips

Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान

Saturday Astro Tips : हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, शनिवारी शनिदेवाची पूजा केली की अनेक समस्या दूर होतात आणि साडेसातीपासून मुक्ती मिळते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक उपायही करतात. या दिवशी भगवान बजरंगबलीची पूजा केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात. मात्र शनिदेवाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

हेही वाचा: Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!

आपण अनेकदा शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वहाव असं ऐकलं असेल; किंवा अगदी हा उपाय तुम्ही करतही असाल. पण याचेही काही नियम आहेत; ते तुम्हाला माहिती आहेत का?

1. शनिदेवांच्या मूर्तीसमोर उभं राहून त्यांची पूजा कधीही करू नये. असं म्हणतात की मूर्तीची पूजा नेहमी उजव्या किंवा डाव्या बाजूने करावी. कधीही समोरून करू नये कारण असं केल्याने शनिदेवाची वक्री नजर आपल्यावर पडू शकते.

हेही वाचा: Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ

2. शनिदेवाचं खरं रूप कोणीही बघू नये असं म्हणतात त्यामुळे कधीही मूर्तीत डोकावून त्यांच्या डोळ्यात बघू नये. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या मूर्तीऐवजी शनिदेवाचे पाषाण रूप पाहणे चांगले.

3. शनिदेवाला तेल अर्पण करताना विशेष काळजी घ्यावी. खरंतर तेल अर्पण करताना ते इकडे तिकडे पडू नये हे लक्षात ठेवा.

हेही वाचा: Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

4. जर तुम्हाला घरामध्ये शनिदेवाची पूजा करायची असेल तर शनिदेवाचे ध्यान करताना पश्चिम दिशेला बसून ती पूजा करा.

5. शनिदेवाला तेल अर्पण करताना काही भक्त शनिदेवाच्या डोक्यावर तेल अर्पण करू लागतात, जे अजिबात करू नये. असे केल्याने तुमच्या समस्या हळू हळू संपतात.

याउलट जर शनिदेवांच्या पायाच्या सर्वात लहान बोटावर अर्थात करंगळीवर तेल अर्पण केलं तर तुमच्या सर्व समस्या लवकर दूर होतील.