Astro Tips: बसल्या जागी सतत पाय हलवण्याची सवय आहे? आत्ताच थांबवा नाहीतर...

अनेकदा घरातल्या वडीलधारी मंडळींनी असं करु नकोस असं म्हणत टोकलं सुद्धा असेल. हे असं करणं खूप अशुभ मानलं जातं
Astro Tips About Shaking Legs
Astro Tips About Shaking Legs esakal

Astro Tips About Shaking Legs : अनेकांना कुठेही बसलेल्या जागी सतत आपले पाय हलवण्याची सवय असते. स्ट्रेसमुळे अनेकदा आपल्याला ही सवय लागते. तुम्हाला यावरुन अनेकदा घरातल्या वडीलधारी मंडळींनी असं करु नकोस असं म्हणत टोकलं सुद्धा असेल.

हे असं करणं खूप अशुभ मानलं जातं. त्याने दारिद्र्य तर येतच पण सोबतच अनेक नकारात्मक गोष्टींना आपण निमंत्रण देतो. या सवयीमुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण देत आहात.

ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की या सवयीमुळे केवळ पैशांच्या संबंधित म्हणजे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही तर शरीरात अनेक प्रकारचे रोग देखील उद्भवू लागतात. पाय हलवणे ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. अशात जाणून घेऊया यचे दुष्परिणाम:

Astro Tips About Shaking Legs
Kitchen Astro Tips: किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का? काय आहेत त्यांचे नियम

चंद्र वक्री होतो.

ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेले आहे की बसून किंवा पडून पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती बिघडते आणि त्याचा अशुभ परिणाम होतो.

असे केल्याने जीवनात तणाव येतो आणि कशातही शांतता वाटत नाही. सतत चिडचिड होते. यासोबतच घरातील कोणी ना कोणी व्यक्ती आजारी पडतो, त्यामुळे अनावश्यक धावपळ होते आणि पैसा खर्च होतो.

लक्ष्मी देवी क्रोधित होतात

आपण सगळेच पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घेतो पण जर लक्ष्मी देवीच कोपित होणार असतील तर याचा कायच फायदा? धनाची देवी माता लक्ष्मीच्या कोपामुळे धनाशी संबंधित कामात अडथळे येतात आणि भाग्यही साथ देत नाही.

हे एखाद्या व्यक्तीच्या आनंदाची, यशाची आणि संपत्तीची पातळी कमी करते. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर लगेच ही सवय बदला.

Astro Tips About Shaking Legs
Astro Tips For Shani : शनीचा मित्र अन् शत्रु कोण? कशी बदलेल तुमची ग्रहदशा, जाणून घ्या

पूजा करत असतांना

जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून पूजा करत असाल आणि पाय हलवत असाल तर तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही आणि तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

त्याचवेळी, घराची वास्तु दैवत देखील कोपते. हळूहळू ही सवय तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते, ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो.

जेवताना पाय थरथरणे

खुर्चीवर आणि टेबलावर बसून जेवताना, पाय हळूहळू हलवण्याची सवय अनेकांना असते. जेवतांना पाय हलवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अस केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि घरात धन-धान्याची समस्या निर्माण होते.

Astro Tips About Shaking Legs
Astro Tips : मैत्रिणींनो, अंघोळीनंतर लगेचच करू नका हे काम, भोगावे लागतील वाईट परिणाम

याचा नकारात्मक प्रभाव

संध्याकाळी पाय हलवण्याची सवय अत्यंत अशुभ मानली जाते. त्याचा केवळ तुमच्यावरच नाही तर कुटुंबातील सदस्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. यासोबतच अनेकदा लोक रात्री झोप लागत नसल्याने पाय हलवत राहतात, हे देखील योग्य मानले जात नाही.

असे केल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि कुटुंबात विनाकारण भांडणं होतात.

यामागच शास्त्र नक्की काय?

बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्यानेही अनेक प्रकारचे आजार जन्माला येतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते असे संशोधनातून दिसून आले आहे.

शास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे हृदय, किडनी, पार्किन्सन्स वाढणे आणि शरीरात लोहाची कमतरता या समस्याही उद्भवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com