
Shani Amavasya 2022: ‘या’ पाच राशींवर शनिदेव होणार मेहरबान
शनी अमावस्या हा शनिला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. या दिवशी दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनि व्यक्तीला सुख, समृद्धीचा आशीर्वाद देतात. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिचा व्रत केल्यास जीवनात असणाऱ्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
शनि अमावस्या असल्याने काही ठराविक राशींवर शनिची कृपा असणार आहे. त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Shani Amavasya special shani dev will show grace on these five zodiac signs)
मेष राशी
मेष राशीच्या लोकांवर आज शनीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ असणार. आर्थिक समस्येपासून त्यांना सुटका मिळणार. एवढंच काय तर आरोग्याच्याही समस्या दुर होणार. नोकरी-व्यवसायात लाभ होईल.
मिथून राशी
मिथून राशीवर शनि देवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या नोकरीची संधी मिळणार याशिवाय त्यांना व्यवसायात अधिक फायदा होईल. सोबतच कुटूंबात सौख्य लाभणार.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा दिसेल. आज त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण होणार. मेहनतीनुसार फळ मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळेल. हातातली कामे मार्गी लागतील.
तुळ राशी
या राशीत शनीची साडेसाती सुरू आहे जी लवकरच संपणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे शुभ दिवस लवकरच सुरू होणार आहेत शनिच्या कृपेने समस्या सुटतील आणि भरघोस यश मिळणार. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा दिसणार. आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून सुटका मिळेल. सोबत नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होणार. मान-सन्मान वाढेल.