Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो तुमच्या आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shani Astro Theory

Shani Astro Theory : तुमच्या कुंडलीतील शनी ठरवतो आयुष्याची दिशा, जाणून घ्या महत्वपूर्ण सिद्धांत

Shani Astro Theory : कुंडलीतील ग्रहचक्रातला एक अत्यंत महत्वाचा ग्रह म्हणजे शनी. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाचे कुंडलीत येणारे स्थान हे जातकाचा आयुष्यावर विशेष परिणामकारक असतात. कारण शनी देवाला कलियुगाचा न्यायाधीश मानले जाते. शनी ग्रहाचे जातकाच्या कुंडलीतील स्थान जातकाच्या आयुष्यातील घडामोडींशी संबंधीत आहेत. शनी ग्रह संबंधित असे काही महत्वपूर्ण सिद्धांत आपण आता जाणून घेऊया.

1) शनी व राहू धनस्थानात असता व्यक्तीचा जन्म गरीब घराण्यात झालेला असतो.

2) शनी व हर्षल धनस्थानात असता आयुष्यात आकस्मित आर्थिक हानी संभावते.

3) शनी कुंडलीत मंगळाच्या पूर्ण दृष्टीत (अंशात्मक) असेल तर मनुष्याच्या जीवनात जिवावर बेतणारे प्रसंग येतात.

4) शनी मंगळ- धन स्थानी असणे हा दारिद्र्य योग असून सधन व्यक्तीही अखेर निर्धन बनते.

5) धनस्थानी पापग्रह युक्त शनी असेल तर कर्जबाजारीपणा असतो. काही प्रसंगी वडिलांचे कर्ज फेडावे लागते.

6) शनी मंगळ यांची तृतीय स्थानी युती बंधू सौख्य देत नाही.

7) शनी चंद्र यांची युती असलेली माणसे कठोर बोलणारी असतात. तसेच अप्रामाणिक सुद्धा असतात.

8) धन स्थानी मकर, कुंभ, तुला या राशी सोडून इतर राशीत शनी असेल तर मोठ्या प्रयत्नानेच पैसा मिळतो तथा मिळवावा लागतो.

9) शनी हा ग्रह फार दिवस टिकणारे रोग आणि रेंगाळणारी दुखणी निर्माण करतो. थंडी व औदासीन्य त्याचप्रमाणे हलगर्जीपणा यामुळे होणारे रोग कुंडलीत शनी बिघडल्यामुळेच होतात.

हेही वाचा: Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

10) शनी अष्टमात असता जीवनसाथीस आरोग्य समस्या असतात/ उद्भवतात.

11) अष्टमात एकटा शनी असलेली व्यक्ती दीर्घायुषी असते.

12) शनी व मंगळ दशम किंवा नवम स्थानात असता संतती प्राप्तीस अडचणी येतात.

13) शनी गुरूने युक्त असेल तर 'लिव्हर' चे कार्य नीटचालणार नाही

14) सप्तमेश शनी किंवा सप्तमात शनी असता पती किंवा पत्नी सुस्वरूप नसते. काही प्रसंगी विजोडी असतात. (उदा. पती उंच तर पत्नी ठेंगु, पत्नी गौरवर्णी तर पती काळा याप्रकारे)

माहिती विवेचन - पं. नरेंद्र धारणे, नाशिक

हेही वाचा: Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

टॅग्स :AstrologySanskruti