Shani Sade Sati Relief Date
esakal
शनीची साडेसाती म्हटलं की अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो. ही साडेसाती नेमकी कधी संपणार? सध्या कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना पुढचा काळ कसा असेल आणि कधी दिलासा मिळेल, याची उत्सुकता लागली आहे. ज्योतिषाचार्य पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांना सध्या लगेच मोठा दिलासा मिळणार नाही. शनी मीन राशीत असेपर्यंत या तिन्ही राशींवर साडेसातीचा प्रभाव कायम राहणार आहे.