
Shani Upay : शनी प्रकोप शांत करण्यासाठी निळ्या रंगाचे 'हे' उपाय ठरतात फायदेशीर
Shani Upay : ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफल दाता म्हणतात. शनीची वक्र दृष्टी पडली की, जीवनात अनेक क्लेष वाढतात असे म्हटले जाते. शनी दोष असणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आढळतो त्यांना कमी आयुष्य, आजारपण, दुःख, शारीरिक-मानसिक त्रास, गरिबी, मृत्यू, नोकरी संदर्भात अडचणी, जेल जाण्याचे प्रसंग ओढावू शकतात.
शनी देवाचे रुप काळ्या रंगात आहे असे मानले जाते. पण त्यांना निळ्यारंगाशीदेखील जोडलं जातं. निळ्यारंगाच्या उपायांनी शनीदेव शांत होतात असे मानले जाते. त्यासाठी कही ठळक आणि सोपे उपाय सांगत आहोत, ज्यामुळे शनी प्रकोप कमी होऊ शकतो.
निळ्या रंगाचा रुमाल
शनी प्रकोप कमी करण्यासाठी कायम निळ्या रंगाचा रुमाल स्वतःसोबत बाळगावा.
निळे फुल
निळ्यारंगाचे फुल शनीदेवाला प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे शनिवारी निळे गोकर्ण शनीदेवाला वाहणे शुभ मानलं जातं.
निळ्या रंगाची सजावट
ज्या कुटुंबातील प्रमुखाला शनीदोष असेल त्यांनी घराच्या भिंतींना फिकट निळा रंग द्यावा. पडदे निळ्या रंगात असावे. शिवाय घर, शाळा, ऑफिस अशा ठिकाणीही निळ्यारंगाची सजावट करावी.
निलम
जर तुम्हाला शनी दोष, साडेसाती असेल तर तुम्ही निळ्या रंगाचा निलम खडा तज्ज्ञांच्या सल्ल्याने धारण करणे फायदेशीर ठरते.
शनीचे दान
शनिवारी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे, चपला-बुटं, फुलं, वस्तू यांचे दान करणे उपयुक्त ठरते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.