

Navratri Ghatasthapana Muhurat: Best Time, Puja Rules & 9 Colors
esakal
सकाळ वृत्तसेवा: शारदीय देवी नवरात्राचा आरंभ येत्या रविवारपासून (ता. ११) होत आहे. यावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.३० ते ११ पर्यंत आणि सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. डॉ. वैद्य यांच्या मते, घटस्थापनेच्या वेळी वातावरणात शुभ ग्रह चंद्र, गुरू, रवी, शुक्र आणि बुध यांचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रवाह राहणार आहे. त्यामुळे या काळात घटस्थापना करणे योग्य राहणार आहे.