
Shattila Akadashi 2023 : आज आहे षटतिला एकादशी, या दिवशी चुकूनही करू नका या 5 चुका
Shattila Akadashi 2023 : आज षटतिला एकादशी आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णूला तिळ अर्पण केले जाते. जो या दिवळी भगवान विष्णूला तिळ अर्पण करण्याबरोबर स्वत:ही तिळाचे सेवन करतो त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात असे म्हटले जाते.
या दिवशी विधीवत भगवान विष्णूची पूजा करावी. त्याने फायदा होतो. चला तर या एकादशीच्या व्रत नियमांबाबत जाणून घेऊया.
षटतिला एकादशीला चुकूनही करू नका या चूका
षटतिला एकादशीला चुकूनही वांगी किंवा भात खाऊ नका.
या दिवशी मांस मटन किंवा मद्यपान करू नका.
या दिवशी बेडवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपा.
या दिवशी तोंडातून अपशब्द काढू नका.
या दिवशी सकाळी दात घासणे चांगले असते. या दिवशी झाडाच्या फांद्या किंवा पाने अजिबात तोडू नका.
एकादशीला आवर्जून करा ही कामे
षटतिला एकादशीला तिळाच्या दानाला विशेष महत्व आहे. तिळापासून बनलेल्या वस्तूही तुम्ही दान करू शकता.
या दिवशी भगवान विष्णूला तिळ अर्पण करणे शुभ असते.
या दिवशी संकल्प घेणाऱ्या व्यक्तींनी तिळाचं उटणं किंवा तिळाच्या पाण्याने स्नान करायला हवं.
षटतिला एकादशीलैा व्रतकथा ऐकल्यानंतर तिळ अर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो.
हेही वाचा: Maa Lakshmi Upay : मेहनत करूनही कमाई वाढत नाहीये, मग घरी आणा या 4 गोष्टी, होईल मातेची कृपा अन् धनवर्षाव
महत्व
वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचं स्वत:चं वेगळं महत्व आहे. वैदिक शास्त्रात एकादशी व्रताला सगळ्यात मोठ्या व्रताचा दर्जा दिला गेलाय.
(डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही)