
Shattila Ekadashi 2023 : षटतीला एकादशीची पौराणिक व्रत कथा आहे?
पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख 18 जानेवारी, बुधवार, म्हणजेच आज षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्ष प्राप्त करतात. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्तीला एकादशी व्रताची कथाही अवश्य ऐकावी, तरच उपासनेचे व व्रताचे पूर्ण फळ मिळते.
षटतिला म्हणजे सहा प्रकारच्या तीळांचा वापर असलेली एकादशी. या एकादशीला तीळ सहा प्रकारे वापरतात. या दिवशी खालील सहा प्रकारे तिळाचा वापर करणे अत्यंत फलदायी मानले जाते. प्रथम तीळमिश्रित पाण्याने स्नान, दुसरे तिळाच्या तेलाने मसाज, तिसरे तिळाचे हवन, चौथे तिळाच्या पाण्याचे सेवन, पाचवे तिळाचे दान आणि सहावे तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन. या एकादशीचे व्रत करणार्याला दारिद्र्य आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते, असे प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे.
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी दुधी भोपळ्याची खिर कशी तयार करायची?
आजच्या लेखात आपण बघू या षटतीला एकादशीची पौराणिक व्रत कथा नेमकी कोणती आहे त्याविषयीची सविस्तर माहिती...
हेही वाचा: Winter Recipe: असंख्य आजारावर रामबाण उपाय असलेल्या पावट्याची आमटी कशी करतात?
धार्मिक मान्यतेनुसार, एकदा नारद मुनी भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या बैकुंठ येथे पोहोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षट्तीला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की, प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती. एकदा त्या ब्राम्हणींनी महिनाभर उपवास करून माझी पूजा केली.
व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे, त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील, म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो. मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला, ते घेऊन मी परतलो.
हेही वाचा: Winter Recipe: खान्देशातील पारंपरिक पदार्थ असलेले पौष्टिक लांडगे कसे तयार करायचे?
काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे. मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितले की, अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले.
तेव्हा मी तिला सांगितले की, जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील, तेव्हा तू षट्तीला एकादशीच्या व्रताचा नियम सांगीतल्यावर तू तुझे दार उघड. विष्णू देवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राम्हणीने तेच केले आणि षट्तीला एकादशीचे व्रत केले. उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारदा, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणार्याला मुक्ती व वैभव प्राप्त होते.